Shruti Vilas Kadam
इमरतीसाठी 1 कप उडीद डाळ, 2 कप साखर, पाणी, वेलची पूड, केशर किंवा फूड कलर आणि तळण्यासाठी तूप किंवा तेल घ्या.
उडीद डाळ स्वच्छ धुऊन साधारण 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर डाळीतील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून टाका.
भिजवलेली उडीद डाळ मिक्सरमध्ये कमी पाणी वापरून बारीक वाटा. तयार पीठ हलके आणि फ्लफी होईपर्यंत काही मिनिटे चांगले फेटून घ्या.
एका पातेल्यात साखर आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन उकळा. त्यात वेलची पूड आणि केशर घाला. इमरतीसाठी थोडा चिकट, एकतारीच्या आसपासचा पाक तयार करा.
तयार पीठ पाइपिंग बॅग किंवा स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरा. गरम तेल किंवा तुपात गोलाकार जाळीसारखा पारंपरिक इमरतीचा आकार तयार करा.
इमरती मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. खूप मोठ्या आचेवर तळल्यास बाहेरून लवकर रंग येऊन आतील भाग कच्चा राहू शकतो.
तळलेली गरम इमरती कोमट साखरेच्या पाकात काही मिनिटे बुडवून ठेवा. पाक शोषल्यानंतर बाहेर काढा. तयार झाली कुरकुरीत आणि रसाळ इमरती.