Shruti Vilas Kadam
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास आणि पोटातील जडपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
बडीशेपमधील नैसर्गिक घटकांमुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचनासारख्या तक्रारींमध्ये काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
बडीशेप चघळल्याने तिच्या सुगंधी तेलांमुळे तोंडाला ताजेपणा मिळतो आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
बडीशेपमध्ये अँटिऑक्सिडंट घटक आढळतात. हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
बडीशेपमध्ये असलेले काही पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. केसगळती कमी होण्यास मदत होते. .
बडीशेप पाण्यात भिजवून किंवा उकळून घेतल्यास ते एक सुगंधी पेय म्हणून घेता येते. त्यामुळे दैनंदिन द्रवपदार्थांच्या सेवनात भर पडू शकते.
जेवणानंतर थोडी बडीशेप चघळणे हा सोपा पर्याय आहे. कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन करण्यापेक्षा संतुलित प्रमाणात सेवन करणे योग्य ठरते.