Shruti Vilas Kadam
जेवणानंतर थोडे चालल्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. चालताना शरीरातील स्नायू साखरेचा वापर करतात. त्यामुळे जेवणानंतर साखर वाढण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. मधुमेह असणाऱ्यांसाठीही ही सवय फायदेशीर ठरते.
जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी थोडे चालावे. यामुळे अन्न पचण्यास मदत होते. तसेच पोट फुगणे, गॅस आणि ढेकर येण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
दररोज चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. जेवणानंतर थोडे चालल्याने शरीराची हालचालही होते.
जेवल्यानंतर चालल्याने शरीराच्या हालचाली वाढतात आणि काही कॅलरी खर्च होतात. रोज ही सवय ठेवल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
जेवणानंतर थोडा वेळ बाहेर फिरल्याने मनाला प्रसन्न वाटते. यामुळे दिवसभराचा थकवा आणि ताण कमी होण्यास मदत होते. शरीरही हलके वाटते.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने काही लोकांना छातीत जळजळ आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी थोडे चालावे. मात्र, खूप वेगाने चालू नये.
रात्री जेवण झाल्यानंतर थोडे चालल्याने पोट हलके राहण्यास मदत होते. शरीराची हालचाल झाल्यामुळे आराम वाटतो आणि रात्री शांत झोप लागण्यासही मदत होऊ शकते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.