Manasvi Choudhary
हाय ब्लड प्रेशर हा एक गंभीर आजार असला तरी याची लक्षणे ही नकळत दिसतात.
हाय ब्लड प्रेशरमध्ये सुरूवातीला थकवा येतो. अनेकजण सामान्य समजून याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हार्टअॅटक येण्याचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.
सकाळी उठल्याबरोबर डोकं दुखणं ही एक अशी समस्या आहे, ज्याकडे अनेक जण चहा न मिळाल्यामुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे होणारा त्रास म्हणून दुर्लक्ष करतात. पण, जर हे रोजच घडत असेल, तर ते शरीरात वाढणाऱ्या एका गंभीर आजाराचे लक्षण असू शकते,
दिर्घकाळ टिकणारा रक्तदाब नकळतपणे हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकतो.
वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी उठल्यानंतर डोक्याच्या मागच्या भागात सौम्य वेदना होत असतील तर उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते.
सकाळी रक्तदाबात अचानक वाढ झाल्याने स्ट्रोक , हृदय आणि रक्तवाहिन्या या आजारांचा धोका वाढतो.
मानेचा शिरांमध्ये स्पंदन जाणवणे, विचार करण्याची क्षमता मंदावणे आणि वारंवार नाकातून रक्त येणे ही शरीरात वाढलेल्या रक्तदाबाची लक्षणे असू शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.