Titwala Waterfall : धुकं, हिरवागार निसर्ग अन् खळखळणारे धबधबे, टिटवाळ्याजवळील 'हे' ठिकाण पावसाळ्यात बनते स्वर्ग

Shreya Maskar

टिटवाळा

वाघेरा पाडा धबधबा कल्याण-मुर्बाड रोडवर असलेल्या कंबा गावात आहे. हा धबधबा मुख्य रस्त्यापासून साधारण १ किमी अंतरावर, टिटवाळ्याजवळ आहे.

Titwala | google

वाघेरा पाडा धबधबा

पावसाळ्यात वाघेरा पाडा धबधब्याचे सौंदर्य खुलते. येथे एकमेकांच्या जवळ वाहणारे चार वेगवेगळे धबधबे पाहायला मिळतात.

Waghera Pada Waterfall | google

फॅमिली ट्रिप

वाघेरा पाडा धबधब्याच्या जवळच राहण्याची, खाण्या-पिण्याची उत्तम सोय आहे. तुम्ही येथे पावसाळ्यात वन डे ट्रिप प्लान करू शकता.

Family trip | google

मुख्य आकर्षण

वाघेरा पाडा धबधब्याला गेल्यावर तुम्हाला जंगल ट्रेकिंग, फोटोशूट आणि नैसर्गिक खडकांच्या कुंडात पोहण्याचा आनंद घेतात.

main attraction | google

योग्य वेळ काय?

वाघेरा पाडा धबधब्याला जाण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा काळ सर्वोत्तम आहे. तुम्ही टिटवाळा स्टेशनला उतरल्यावर पुढे रिक्षाने वाघेरा पाडा धबधब्यापर्यंत पोहचाल.

What is the right time? | google

पर्यटन स्थळे

वाघेरा पाडा धबधब्याजवळ हिराडपाडा धबधबा, कलमांडवी धबधबा, धोढाडी धबधबा आहे. तुम्ही येथे पावसाळ्यात चिंब भिजण्याचा आनंद घेऊ शकता.

tourist spots | google

हिराडपाडा धबधबा

१२० फूट उंचीचा हिराडपाडा धबधबा मुंबईपासून सुमारे ११५ किलोमीटर अंतरावर जव्हार येथे आहे. येथे हिरवीगार दरी आणि 'क्लिफ जंपिंग'चा अनुभव घेता येतो.

Hiradpada Falls | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

Satara Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...