Shreya Maskar
महाबळेश्वरपासून सुमारे २५ किमी आणि मुंबईपासून साधारण २८० किमी अंतरावर वसलेले 'तापोळा' हे 'महाराष्ट्राचे मिनी काश्मीर' म्हणून ओळखले जाणारे सुंदर गाव आहे. तापोळा हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात आहे
'तापोळा' हे गाव शिवसागर सरोवर आणि वासोटा किल्ल्याच्या रोमांचक जंगल ट्रेक यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे फॅमिली ट्रिप देखील प्लान करू शकता.
शिवसागर सरोवराला भेट दिल्यावर कयाकिंग आणि बोटिंगसारख्या जलक्रीडांचा आनंद घेता येतो. तुम्ही येथे संध्याकाळी निवांत वेळ घालवू शकता.
तापोळा हे कोयना आणि सोळशी नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. तुम्ही 'तापोळा' या ठिकाणी गेल्यावर निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.
वासोटा किल्ला कोयना अभयारण्याच्या दाट जंगलात वसलेला आहे. तुम्ही येथे कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात येथे नक्की जा.
पावसाळ्यात हे अभयारण्य निसर्गाच्या विविध रूपांनी बहरून जाते. हे ठिकाण जीप सफारी, पक्षीनिरीक्षण यांचा आनंद घेण्यासाठी बेस्ट आहे.
तापोळाजवळ ठोसेघर धबधबा आहे. पावसाळ्यात येथे धुक्याची चादर पाहायला मिळते. तसेच सुंदर इंद्रधनुष्य देखील उमटते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.