Shreya Maskar
पावसाळ्यात तुम्हाला धबधबे, समुद्रकिनारे आणि हिल स्टेशन फिरून कंटाळा आला असेल तर मुंबईच्या गर्दीत लपलेले हे सुंदर पाहायला नक्की जा. ज्याचे नाव खोताची वाडी असे आहे.
खोताची वाडी हे मुंबईतील गिरगाव भागातील १८ व्या शतकातील एक ऐतिहासिक वारसा स्थळ (हेरिटेज व्हिलेज) आहे. वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
खोताची वाडी पोर्तुगीज शैलीतील रंगीबेरंगी लाकडी घरे, शांत व वळणावळणाच्या गल्ल्या यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईत फोटोशूटसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
खोताची वाडीला जाण्यासाठी ट्रेनने चर्नी रोड रेल्वे स्टेशनला उतरा. तेथून चालत अवघ्या ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे.
मुंबईत 'मिनी गोवा'चा अनुभव घ्यायचा असेल तर खोताची वाडीला नक्की जा. सभोवतालची बाल्कनी, उतरती छपरे आणि बाहेरून जाणारे जिने ही बंगल्यांची वैशिष्ट्ये आहेत.
खोताच्या वाडीपासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर गिरगाव चौपाटी आहे. येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच चटपटीत स्ट्रीट फूडही मिळते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.