Mumbai Shopping Markets : छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल; मुंबईतील 'या' शॉपिंग मार्केटमध्ये मिळेल सर्वकाही स्वस्तात मस्त

Shreya Maskar

कुलाबा कॉजवे

कुलाबा कॉजवे साऊथ मुंबईत येते. येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते येथे पावसाळी कपडे, रेनकोट, ॲक्सेसरीज आणि चप्पलांचे शेकडो डिझाईन्स पाहू शकता. स्ट्रीट शॉपिंग सोबतच तुम्ही येथे स्ट्रीट फूडचा आनंदही घेऊ शकता.

Colaba Causeway | GOOGLE

हिल रोड

हिल रोड हे वांद्रे येथे येते. याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टर्न आउटफिट मिळतात. येथे तुम्हाला शॉर्ट जीन्स, रेनकोट आणि छत्रीचे विविध प्रकार पाहायला मिळतात.

Hill Road | GOOGLE

क्रॉफोर्ड मार्केट

क्रॉफोर्ड मार्केट हे मुंबईतील सर्वात जुने शॉपिंग मार्केट आहे. स्वयंपाकघरातील वस्तू, सजावटीच्या वस्तू येथे मोठ्या प्रमाणात मिळतात. तसेच सुंदर रेडीमेड ब्लाउजच्या डिझाइन्सही येथे उपलब्ध आहेत.

Crawford Market | GOOGLE

लोखंडवाला मार्केट

महिलांना शॉपिंगसाठी लोखंडवाला मार्केट बेस्ट ऑप्शन आहे. अंधेरी येथे लोखंडवाला मार्केट आहे. महिला, पुरुष, लहान मुलांसाठी येथे पावसाळी शूजच्या सुंदर व्हरायटी पाहायला मिळतात.

Lokhandwala Market | GOOGLE

फॅशन स्ट्रीट

चर्चगेट येथे फॅशन स्ट्रीट आहे. येथे स्वस्तात मस्त कपडे आणि इतर सर्व गोष्टी मिळतात. अनेक वाटरप्रूफ गोष्टी देखील येथे मिळतात. मोबाईल आणि बॅग कव्हर देखील येथे उपलब्ध आहेत.

Fashion Street | GOOGLE

दादर होलसेल मार्केट

दादर होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला फॅशनेबल छत्री आणि रेनकोट मिळतील. तसेच पावसाळ्यात नेसता येतील अशा साड्या देखील येथे मिळतात.

Dadar Wholesale Market | GOOGLE

लिंकिंग रोड

तरुणाईला मनसोक्त शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल तर लिंकिंग रोड बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला येथे वाटरप्रूफ मेकअप प्रोडक्ट्स मिळतील. तसेच पावसाळ्यात ऑफिस आणि कॉलेजसाठी सुंदर ऑउटफिट खरेदी करू शकता.

Linking Road | GOOGLE

झवेरी बाजार

झवेरी बाजार साऊथ मुंबईमध्ये येते. बजेट-फ्रेंडली ॲक्सेसरीज, इमिटेशन ज्वेलरी आणि पावसाळ्यात छत्र्‍यांचे विविध प्रकार आणि डिझाइन्स येथे पाहायला मिळतात.

Zaveri Bazar | GOOGLE

NEXT : स्वेटर, कानटोपी, मफलर; कमी पैशांत बेस्ट व्हरायटी, मुंबईतील Winter शॉपिंग मार्केट

Mumbai Shopping Markets | yandex
येथे क्लिक करा...