Volvo Electric SUV: टेस्लाला टक्कर देण्यासाठी Volvo लाँच करणार इलेक्ट्रिक एसयूव्ही, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इलेक्ट्रिक कार

सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असून अनेक जण पारंपरिक वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक कार खरेदीला अधिक प्राधान्य देत आहेत.

Volvo

Volvo ही एक कंपनी आहे जी भारतात आपली इलेक्ट्रिक वाहनांची श्रेणी वाढवण्याच्या तयारीत आहे.

लाँच करण्याची तयारी

Volvo कंपनी भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक SUV, Volvo EX30, लाँच करण्याची तयारी करत आहे.

कारची सविस्तर माहिती

टेस्ला मॉडेल Y ला टक्कर देण्यासाठी Volvo EX30 सज्ज असून, आता आपण या कारची सविस्तर माहिती पाहूया.

इलेक्ट्रिक SUV

मीडिया रिपोर्टनुसार, Volvo EX30 ही इलेक्ट्रिक SUV सध्या भारतात टेस्टिंगच्या प्रक्रियेत आहे आणि ती लवकरच भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.

कंपनीची सर्वात छोटी कार

Volvo EX30 ही कंपनीची सर्वात छोटी आणि किफायतशीर इलेक्ट्रिक SUV असेल, जी आंतरराष्ट्रीय बाजारात EX40 आणि EC40 च्या खालील सेगमेंटमध्ये बसते.

डिझाइन

Volvo EX30 चं डिझाइन EX90 SUV सारखं आहे. टेस्टिंगदरम्यान झाकलेलं असतानाही एलईडी हेडलाइट्स, थॉर हॅमर DRL आणि पिक्सेल टेललाइट्स दिसले.

इंटिरिअर

Volvo EX30 च्या इंटिरिअरमध्ये आंतरराष्ट्रीय मॉडेलसारखं साधं आणि आकर्षक डिझाइन मिळण्याची शक्यता असून, 12.3 इंच व्हर्टिकल टचस्क्रीन मिळू शकते.

किंमत

कंपनीने लाँचिंग तारीख जाहीर केलेली नसली तरी, सणासुदीपर्यंत Volvo EX30 लाँच होण्याची शक्यता असून किंमत 42-45 लाखांच्या दरम्यान असू शकते.

NEXT: टाटा हॅरियर ईव्ही लाँच! टेस्ला आणि बीवायडीला टक्कर देण्यासारखे आहेत खास फीचर्स, किंमत

येथे क्लिक करा