Manasvi Choudhary
शरीराचा प्रत्येक अवयव हा कोणत्या ना कोणत्या गंभीर समस्याचे संकेत देत असतो. नखांमधील बदल देखील गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
नखांचा बदलणारा रंग, नखांवर पडणारे पांढरे डाग किंवा नखे वारंवार तुटणे या गोष्टींकडे आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो.
मात्र नखांची रचना आणि त्यांचा रंग पाहून शरीरात नेमकी कोणत्या घटकाची कमतरता आहे हे ओळखणे महत्वाचे आहे.
नखांवर लहान-मोठे पांढरे ठिपके किंवा रेषा दिसतात. वैद्यकीय माहितीनुसार, नखांवर पांढरे डाग असणे हे शरीरात कॅल्शियम किंवा झिंकची कमतरता असल्याचे मुख्य लक्षण असू शकते.
हाता-पायांची नखे अचानक पिवळसर दिसू लागली, तर ते शरीरात कावीळ किंवा नखांमधील बुरशीजन्य संसर्गाचे संकेत असू शकतात.
जर तुमची नखे थोडी वाढली की तुटत असतील, तर शरीरातील झिंक, कॅल्शियम सारख्या आवश्यक व्हिटॅमिन्सचे प्रमाण कमी झाले आहे हे समजून जा.
जर पायांची किंवा हातांची नखे खूपच पातळ झाली असतील आणि ती सपाट राहण्याऐवजी आतल्या बाजूने वाकलेली दिसत असतील, तर हे शरीरात लोह म्हणजेच आयर्नची कमतरता असू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.