ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी आरोग्यासाठी तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळणं आवश्यक असते.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक घटक आहे.
व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते.
परंतु तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढल्यामुळे तुम्हाला मळमळ आणि पोटदुखी सारख्या समस्या होऊ शकतात.
शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढल्यास तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्या उद्भवू शकतात.
शरीरातील व्हिटॅमिन सी वाढल्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होण्याची शक्यता आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.