Shreya Maskar
आपण अनेक वेळा घाईत जेवण बनवतो. त्यामुळे आपल्या कडून कधीतरी तिखट-मीठ जास्त पडते.
पदार्थात जास्त तिखट पडल्यामुळे तो पदार्थ खाता येत नाही आणि मग टाकून दिला जातो.
असा पदार्थ टाकून दिला जाऊ नये. म्हणून तिखट भाजीमध्ये हे पदार्थ मिसळा आणि भाजीची चव वाढवा.
भाजीमध्ये तिखट जास्त पडल्यास त्यात थोडे दही आणि टोमॅटोची प्युरी घालावी. यामुळे तिखट कमी होते आणि चव देखील चांगली लागते.
तिखट कमी करण्यासाठी डेअरी प्रॉडक्टचा तुम्ही वापर करू शकता.
चुकून एखाद्या वेळी भाजीत मसाला जास्त पडल्यास फ्रेश क्रीम भाजीमध्ये घालावी.
अनेक लोक जेवणात तुपाचा वापर करतात. हेच तूप पदार्थातील तिखटपणा दूर करण्यास मदत करते.
एक चमचा तूप तिखट भाजीत टाकल्यास भाजीची चव सामान्य होते.
सुक्या भाजीत तिखट जास्त पडले असेल तर, त्यात अर्धा चमचा बेसन घाला आणि छान मिक्स करा.