ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तेलंगणातील हैदराबाद शहरात भेट देण्यासाठी अनेक ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणे आहेत.
हैदराबाद शहर जवळच एक स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन आहे. येथे भेट द्यायला विसरु नका.
हैदराबादजवळील अनंतगिरी हिल्स हे एक अतिशय सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे. धावपळीच्या जीवनातून तुम्ही येथे निवांत वेळ घालवू शकता.
नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण हे ठिकाण पाहून तुमच्या मनाला नक्की भुरळ पडेल.
जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर येथे नक्की जा. निसर्गाच्या सानिध्यातील ही ट्रेकिंग अविस्मरणीय ठरेल.
हिरवेगार डोंगर, धुक्यांची पसरलेली चादर आणि थंड वातावरण असलेले हे ठिकाण पिकनिकसाठी परफेक्ट आहे.
हैदराबाद शहरापासून ७८.७ किलोमीटर अंतरावर अनंतगिरी हिल्स आहे.