ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फिरण्यासाठी शांत अन् सुंदर ठिकाण शोधताय, तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या.
नैसर्गिक सुंदरताने नटलेल्या या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि कॅम्पिंगचा देखील आनंद घेऊ शकता.
मुंबईपासून ८० किलोमीटर अंतरावर लोणावळा हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही कॅम्पिंगसह अॅडव्हेंचरस अॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता.
निसर्गाच्या सानिध्यात शांत अन् सुंदर ठिकाणी वेळ घालवण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे. मुंबईपासून ८५ किलोमीटर अंतरावर माथेरान हिल स्टेशन आहे.
पावसाळ्यात येथील हिरवेगार डोंगर, धुक्यांची पसरलेली चादर आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांचे नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी येथे नक्की भेट द्या.
येथील ओसंडून वाहणारे धबधबे, धुक्यांनी झाकलेले डोंगर तुमच्या मनाला भुरळ घालतील. मुंबईपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेले खंडाळा हिल स्टेशन पिकनिकसाठी बेस्ट आहे.
इगतपुरी हे ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि डॅमसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तुम्ही येथे कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेऊ शकता.