ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईकरासह अनेक शहरातील कलाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.
यंदाच्या काला घोडा फेस्टिवलच्या शुभारंभ सुरु झालाय. या फेस्टिवलचा अंतिम दिवस २८ जानेवारी आहे.
या फेस्टिवलमध्ये कॉमेडी, नृत्य, चित्रपट, खाद्य, साहित्य, संगीत, नाट्य, शहरी रचना, वास्तुकला आणि व्हिज्युअल आर्टस यासह असंख्य कलात्मक विषयांचे प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
काला घोडा फेस्टिव्हलचे विशेष आकर्षण म्हणजे कलाकार आणि नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ मिळते.
उद्देशलोकांमध्ये कला जागरुकता पसरवण्याच्या उद्देशाने दक्षिण मुंबईत काला घोडा कला महोत्सावाची सुरुवात झाली.
गेल्या काही वर्षांत या फेस्टिव्हलची लोकप्रियता इतकी वाढली आहे. मुंबईसह इतर ठिकाणाचे लोकही फेस्टिवल पाहण्यासाठी येतात.
काला घोडा फेस्टिवलची वेळ सकाळी १०:०० ते रात्री १०:०० अशी आहे.
व्हीबी गांधी मार्ग, काला घोडा, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र