Virat Kohli: कसोटीचा 'विराट' राजा! कर्णधार म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड नावावर, वाचा कोहलीचे भारी विक्रम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विराट कोहली

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने याची माहीती दिली.

Virat Kohli | google

निवृत्ती

भारताचा कर्णधार रोहित शर्मानंतर विराट कोहलीने अधिकृतपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधील रिकॉर्ड कसा आहे, जाणून घेऊयात.

Virat kohli | google

कर्णधार

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटच्या ६८ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. यापैकी ४० सामन्यात विजय मिळवून दिला. कोहली हा भारतीय संघाचा यशस्वी कर्णधारापैकी एक आहे.

Virat kohli | google

कसोटी रिकॉर्ड

विराट कोहलीने आपल्या करिअरमध्ये एकूण १२३ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने फक्त ८१ सामन्यामध्ये ७००० धावांचा टप्पा ओलांडला. सर्वात जलद ७००० धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला.

Virat kohli | google

द्विशतक

कर्णधारपदी असताना कोहलीने ब्रायन लाराला मागे टाकत ७ द्विशतक झळकावली. संघाचे नेतृत्व करत सर्वाधिक द्विशतक झळकावणारा जगातील तो एकमेव खेळाडू बनला.

Virat kohli | google

धावा

२१० डावांमध्ये कोहलीने ४६. ८५च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये विराट चौथ्या स्थानावर आहे. १२३ सामन्यात कोहलीने एकूण १०२७ चौकार मारले. तर ३० षटकार मारले.

Virat kohli | google

शतक

५५.५७ च्या स्ट्राइक रेटने दमदार फलंदाजी करत कोहलीने ३१ अर्धशतके तर ३० शतके ठोकली. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ८ शतक ठोकत कोहलीने सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.

Virat kohli | google

NEXT:'या' लोकांनी कच्चा लसूण खाऊ नये, होऊ शकतात गंभीर परिणाम

garlic | canva
येथे क्लिक करा