ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कच्च्या लसणाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. लसूण आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण काही लोकांनी ते खाऊ नये.
ज्या लोकांना लसणाची ऍलर्जी आहे त्यांनीही लसूण खाणं टाळावे.
डोकेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी कच्चा लसूण जास्त प्रमाणात खाऊ नये.
ज्या लोकांच्या तोंडातून दुर्गंधी येते त्यांनीही कच्चा लसूण खाऊ नये.
पोटदुखी, पोट फुगणे आणि गॅसची समस्या असलेल्या लोकांनीही लसूणचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.