Shreya Maskar
पालघर जिल्ह्यातील विरारपासून अंदाजे 40-50 किमी अंतरावर वाडा हे निसर्गरम्य ठिकाण वसलेले आहे. पावसाळ्यात वीकेंडला ट्रिप प्लान करा.
वाडा येथे साजन गावात कोहोज किल्ला वसलेला आहे. हे ठिकाण पावसाळ्यातील ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे. पावसाळ्यात येथील आसपासचा पठारी भाग लहान धबधब्यांनी आणि हिरवाईने नटून जातो.
वाडापासून साधारण २५ ते ३० किमी अंतरावर साजन धरण आहे. हिवाळ्यात दाट हिरवाईने वेढलेले आहे. पावसाळ्यात शांत पिकनिक स्पॉट आहे.
जव्हार हे 'ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. येथे धुक्याने वेढलेल्या दऱ्या आणि नेत्रदीपक दाभोसा धबधबा पाहण्यासारखा आहे.
वाडापासून साधारण ४५ किमी अंतरावर कलमांडवी धबधबा आहे. १०० फूट उंचीचा भव्य धबधबा एका खोल दरीत वसलेला आहे. मुसळधार पावसात येथील सौंदर्य आणखी खुलते.
वाडापासून सुमारे ३७ किमी अंतरावर सूर्यमाळ शिखर आहे. येथून दऱ्या, धुक्याने आच्छादलेली शिखरे आणि दाट जंगलांचे विहंगम दृश्य दिसते.
पालघर येथे धोधडी धबधबा वसलेला आहे. वीकेंडला कुटुंबासोबत वन डे ट्रिपसाठी हे खास लोकेशन आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.