Nalasopara Beach : काळसर वाळू अन् मनमोहक सूर्यास्ताचा अनुभव; मुंबईजवळचा ‘हा’ बीच आहे खास

Shreya Maskar

वीकेंड

वीकेंडला कुठे तरी जवळच फिरण्याचा प्लान करत असाल तर विरार-नालासोपारा बेस्ट ठिकाण आहे. सकाळी जाणून तुम्ही संध्याकाळी निवांत येऊ शकता. ट्रेनलाही कमी गर्दी मिळेल.

weekend | google

विरार-नालासोपारा

मुंबईजवळ पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे सुंदर कळंब बीच वसलेला आहे. हा समुद्रकिनारा खूप कमी लोकांना माहितेय.

Virar-Nalasopara | google

कळंब बीच

संध्याकाळी कळंब बीचवर आवर्जून फेरफटका मारायला जा. येथे सूर्यास्ताचा सुरेख नजारा पाहायला मिळतो. तसेच येथे शांत वातावरण अनुभवता येते.

Kalamb Beach | google

विलोभनीय सूर्यास्त

अरबी समुद्रावर सूर्यास्ताच्या वेळी आकाशात उमटणारी गुलाबी आणि केशरी रंगांची उधळण पाहण्यासाठी पर्यटक अनेकदा संध्याकाळी येथे येतात.

Spectacular sunset | google

गडद रंगाची वाळू

किनाऱ्यावर मऊ, काळ्या/गडद रंगाच्या वाळूचा मोठा पट्टा आहे. ही वाळू प्रदूषणामुळे नाही तर स्थानिक खनिजांच्या साठ्यांमुळे अशा रंगाची आहे.

Dark colored sand | google

साहसी क्रिडा

कळंब बीचला गेल्यावर उंटाची सवारी, घोड्याची सवारी, सायकलिंगचा आनंद घेऊ शकतात. तसेच लहान मुलं येथे वाळूत मजा- मस्ती करताना दिसतात.

Adventure sports | google

कसं जाल?

विरार ट्रेन पकडून नालासोपाऱ्याला उतरा. स्टेशनपासून रिक्षा किंवा बसने तुम्ही प्रवास करून कळंब बीच येथे पोहचाल. बीचवर खाण्यापिण्यासाठी छोटे स्टॉल्स आहेत.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : बॅग भरो निकल पडो! वन डे ट्रिपमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ५ स्पॉट्स

Pune Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...