Pune Tourism : बॅग भरो निकल पडो! वन डे ट्रिपमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ५ स्पॉट्स

Shreya Maskar

मुंबई-पुणे

मुंबईकरांनो पुण्याला वन डे ट्रिप प्लान करा. तुम्ही एका दिवसात पुण्यातील ही सुंदर ठिकाणे फिरू शकता. जेथे पुण्याची संस्कृती आणि इतिहास तुम्हाला जवळून पाहता येईल.

Pune | google

मुळशी धरण

मुळशी धरण हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले आहे. हे विशाल जलाशय-क्षेत्र आपल्या निसर्गरम्य दृश्यांसाठी, शांत वातावरणासाठी आणि पावसाळ्यात आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहे.

Mulshi Dam | google

शनिवारवाडा

मराठा साम्राज्यातील पेशव्यांचे १८ व्या शतकातील ऐतिहासिक ठिकाण म्हणजे शनिवारवाडा होय. हा वाडा आपल्या भव्य प्रवेशद्वारांसाठी आणि संध्याकाळच्या लाईट अँड साऊंड कार्यक्रमांसाठी ओळखला जातो.

Shaniwarwara | google

दगडूशेठ हलवाई मंदिर

पुण्याला जाताच सर्वप्रथम दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरला भेट द्या आणि गणरायाचे दर्शन घ्या. हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित आहे. येथे शांत वातावरण अनुभवता येते.

Dagdusheth Halwai Temple | google

सारसबाग

सारसबाग हे पुण्याचे आकर्षण आहे. २५ एकरांवर पसरलेली सारसबाग ही एक ऐतिहासिक बाग आहे. ही बाग कमळाच्या तलावाने वेढलेल्या आणि मध्यभागी असलेल्या 'तळ्यातल्या गणपती' मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

Sarasbagh | google

तुळशीबाग

पुण्यामधील जुन्या बुधवार पेठेच्या मध्यवर्ती भागात वसलेली तुळशीबाग ही २५० वर्षे जुनी ऐतिहासिक मंदिर-परिसर आणि स्वस्त दरात खरेदीसाठी प्रसिद्ध असलेली एक गजबजलेली खुली बाजारपेठ आहे.

Tulsi Bagh | google

कसं जाल?

मुंबई-पुणे तुम्ही बाय रोड प्रवास करू शकता. तसेच तुम्ही मुंबईहून पुण्याला ट्रेनने प्रवास करा आणि त्यानंतर पुणे स्टेशनला आल्यावर रिक्षाने या सर्व ठिकाणांना भेट द्या.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : महाडजवळ दडलंय निसर्गाचं सुंदर रूप, 'हा' धबधबा ठरेल भन्नाट पिकनिक स्पॉट

Mahad Waterfall | AI PHOTO
येथे क्लिक करा...