Shreya Maskar
विरारजवळ समुद्रकिनारे, किल्ले, जंगल आणि वॉटर पार्क असे विविध प्रकारचे पिकनिक स्पॉट्स आहेत. तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात मस्त आराम हवा असेल तर या विरारला नक्की भेट द्या.
अर्नाळा बीच हा विरारमधील सर्वात लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे. येथे शांत वातावरण, वाळूचा किनारा आणि सुंदर सूर्यास्त अनुभवता येतो. कुटुंबासोबत आराम करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे भन्नाट फोटोग्राफी करता येते. तसेच सुंदर सूर्यास्त दिसतो.
अर्नाळा किल्ला हा समुद्राच्या मधोमध असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे बोटीतून जावे लागते, त्यामुळे प्रवास रोमांचक होतो. ट्रेकिंगसाठी देखील हे ठिकाण बेस्ट आहे.
तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य हे निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी उत्तम ठिकाण आहे. येथे हिरवाई, डोंगर आणि मंदिरे आहेत. जवळून पक्षीनिरीक्षण करता येते.
विरारजवळ भुईगाव धबधबा वसलेला आहे. पावसाळ्यात येथे सुंदर वातावरण अनुभवता येते.
विरारपासून थोड्या अंतरावर केळवा बीच आहे. हा शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. कुटुंबासोबत वन डे पिकनिकसाठी बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे बोटिंग करू शकता.
वसई किल्ला पोर्तुगीज काळातील ऐतिहासिक किल्ला. येथे जुन्या वास्तू आणि फोटोग्राफीसाठी सुंदर जागा आहेत. येथे जाताच इतिहासाची आठवण होते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.