Pune Picnic Spot : पुण्याजवळील 'हे' ठिकाण जणू स्वर्गच, मिळेल बोटिंग अन् फोटोग्राफीचा अनोखा अनुभव

Shreya Maskar

भिगवण

भिगवण हे भीमा नदीवरील उजनी धरणाच्या जलाशयाजवळ, पुण्यापासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेले एक प्रमुख पक्षीनिरीक्षणाचे ठिकाण आहे.

Bhigwan | google

फ्लेमिंगो

भिगवण हे ठिकाण स्थलांतरित फ्लेमिंगोंसाठी (विशेषतः हिवाळ्यात) प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला 'महाराष्ट्राचे भरतपूर' म्हटले जाते.

Flamingos | google

नौकाविहार

भिगवण येथे गेल्यावर कुंभारगावमध्ये नौकाविहार करणे आणि जवळच्या भुलेश्वर मंदिराला भेट देणे ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

Boating | google

फोटोशूट

येथे पर्यटक वन्यजीवांचे फोटोशूट करण्यासाठी आवर्जून येतात. येथील खाद्य संस्कृती देखील खूप प्रसिद्ध आहे.

Photography | yandex

पर्यटन स्थळे

भिगवण जवळ मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य आणि भुलेश्वर मंदिर आहे. भिगवण हे कृषी बाजारपेठ, भाजीपाला आणि केळीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.

Tourist Attractions | google

मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य

मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे बारामती जवळ आहे आणि चिंकारा (इंडियन गझेल) साठी प्रसिद्ध आहे. येथे विविध पक्षी आणि वन्यजीव पाहायला मिळतात.

Mayureshwar Wildlife Sanctuary | google

भुलेश्वर मंदिर

भुलेश्वर हे १३ व्या शतकातील एक प्राचीन शिवमंदिर आहे, जे दौतमांगल किल्ल्याच्या टेकडीवर वसलेले आहे.हे मंदिर तिच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.

Bhuleshwar Temple | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Bhigwan | google

NEXT : राजेशाही वास्तुकला, अप्रतिम सूर्यास्त; 'हा' किल्ला पाहताच आठवेल प्राचीन इतिहास

India Travel | google
येथे क्लिक करा...