Shreya Maskar
राजस्थानमधील जयपूर येथे अरवली पर्वतरांगांच्या काठावर नाहरगड किल्ला वसलेला आहे, जिथून शहराचे विहंगम दृश्य दिसते.
नाहरगड किल्ला आमेर किल्ला आणि जयगड किल्ला यांच्यासोबतच्या त्रिकुटाचा एक भाग आहे, जो हवा महलपासून काही अंतरावर आहे.
नाहरगड किल्ल्यावरून सूर्यास्ताची विहंगम दृश्ये, आकर्षक इंडो-युरोपियन वास्तुकला पाहायला मिळतात.
नाहरगड किल्ला हा 'रंग दे बसंती', 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटांत दिसला आहे.
माधवेंद्र भवन, जयपूर वॅक्स म्युझियम, शीश महाल, पायऱ्यांची विहीर आणि रूफटॉप कॅफे यांसाठी हे सर्व येथील आकर्षण आहे.
नाहरगड किल्ला १७३४ मध्ये महाराज सवाई जयसिंग २ यांनी बांधला. वाघांचे निवासस्थान म्हणून हा किल्ला ओळखला जातो.
नाहरगड किल्ल्याला 'सुदर्शनगड' म्हणूनही ओळखले जाते. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.