Virar Tourism : नारळाची झाडं, खळखळणाऱ्या लाटा; विरारमध्ये लपलंय निसर्गरत्न, 'हे' आहे वीकेंड ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Shreya Maskar

उन्हाळी सहल

मे महिन्याची सुट्टी संपण्याआधी फॅमिलीसोबत वन डे ट्रिप प्लान करा. शहराच्या गर्दीतून दूर विरारला ट्रिप प्लान करा, जेथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्स आनंद घेऊ शकता.

Summer Getaway | pinterest

विरार

उन्हाळ्यात वीकेंडला फिरण्यासाठी मुंबईजवळील विरार येथे असलेला नवापूर बीच हे बेस्ट लोकेशन आहे. नवापूर बीच हा मध्य मुंबईपासून उत्तरेला अंदाजे ६०-७० किमी अंतरावर, विरार (पश्चिम) येथे वसलेला आहे. एक शांत, कमी प्रसिद्ध काळ्या वाळूचा समुद्रकिनारा आहे.

Virar | google

नवापूर बीच

शहरातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत येथील शांत वातावरण, उंच नारळाच्या बागा पर्यटकांना खुणावतात. तु्म्ही येथे वीकेंडला संध्याकाळी निवांत फेरफटका मारायला जाऊ शकता.

Navapur Beach | pinterest

फोटोशूटचा आनंद

नवापूर बीचला तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता. तसेच येथे सायकलिंगचा देखील आनंद घेता येतो. तुम्ही येथे जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.

Photoshoot | pinterest

राहण्याची सोय

नवापूर बीचच्या आजूबाजूला अनेक रिसॉर्ट आणि वॉटर पार्क्स आहेत. जेथे तुम्ही वन डे ट्रिपचा आनंद घेऊ शकता. वेव्ह पूल्स आणि वॉटर स्लाईड्सवर तुम्हाला तुफान मजा-मस्ती करता येईल.

Accommodation & Facilities | pinterest

कसं जाल?

तुम्ही विरार स्टेशनला उतरून तेथून पुढे रिक्षा किंवा बसने तुम्ही नवापूर बीच जवळ पोहचाल. कमी पैशांत जास्त मजा-मस्ती करण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

How ​​to Get There | pinterest

विरार पर्यटन स्थळे

विरार येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. उदा. जीवदानी देवी मंदिर, अर्नाळा बीच आणि किल्ला, तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यान, टकमक किल्ला

Virar Tourist Attractions | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | pinterest

NEXT : दाट धुकं, दऱ्या अन् निसर्गाची जादू; कोल्हापूरजवळ वसलंय लोणावळ्यापेक्षाही सुंदर हिल स्टेशन

kolhapur Tourism | saam tv
येथे क्लिक करा...