kolhapur Tourism : दाट धुकं, दऱ्या अन् निसर्गाची जादू; कोल्हापूरजवळ वसलंय लोणावळ्यापेक्षाही सुंदर हिल स्टेशन

Shreya Maskar

कोल्हापूर

गगनबावडा हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक निसर्गरम्य सुंदर आणि पावसाने न्हाऊन निघालेले थंड हवेचे ठिकाण (हिल स्टेशन) आहे. तुम्हाला उन्हाळ्यात येथे थंडगार वातावरण अनुभवता येते.

Kolhapur | google

गगनबावडा हिल स्टेशन

गगनबावडा सह्याद्रीच्या रांगांमध्ये ३,००० फूट उंचीवर वसलेले आहे. गगनबावडा कोल्हापूरपासून सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तुम्ही येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता.

Gaganbawada Hill Station | google

नयनरम्य घाटांचे सौंदर्य

आपल्या घनदाट अरण्यांसाठी, धबधब्यांसाठी आणि दोन नयनरम्य घाटांसाठी (करुल आणि भुईबावडा) गगनबावडा प्रसिद्ध आहे. घाटांमधील नागमोडी वळणांची, धुक्याने आच्छादलेली विहंगम दृश्ये पाहता येतात.

The Beauty of Scenic Ghats | google

निसर्ग सौंदर्य

गगनबावडा येथे गेल्यावर कोकण किनारपट्टीचे विहंगम दृश्ये दाखवणारे 'व्ह्यू पॉइंट्स' पाहायला मिळतात. पक्षी निरीक्षणासाठी हे ठिकाण खूप सुंदर आहे.

Natural Beauty | google

शूटिंग लोकेशन

गगनबावडा हे बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांसाठी पसंतीचे शूटिंग लोकेशन राहिले आहे. उदा- 'पछाडलेला' चित्रपट

Filming Location | pinterest

ऐतिहासिक ठिकाण

गगनबावडा जवळ गगनगड किल्ला देखील आहे. १२ व्या शतकात राजा भोज (दुसरा) यांनी बांधलेला हा किल्ला करूळ आणि भुईबावडा या दोन प्राचीन घाटांच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता.

Historical Site | google

कसं जाल?

कोल्हापूर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षा किंवा बसने गगनबावडा येथे जाता येथे. पावसाळ्यात गगनबावडा हे हिल स्टेशन स्वर्गाहून सुंदर दिसते.

How to Get There? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | pinterest

NEXT : हिरव्यागार झाडांनी वेढलेला सिंधुदुर्गतील ऐतिहासिक किल्ला, गावी गेल्यावर नक्की पाहायला जा

Sindhudurg | google
येथे क्लिक करा...