Sindhudurg : हिरव्यागार झाडांनी वेढलेला सिंधुदुर्गतील ऐतिहासिक किल्ला, गावी गेल्यावर नक्की पाहायला जा

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

रेडी किल्ला म्हणून यशवंतगड ओळखला जातो. हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी गावात अरबी समुद्राच्या काठावर वसलेला आहे. सुट्ट्यांमध्ये हा किल्ला पाहायला नक्की जा.

Sindhudurg | google

रेडी किल्ला

रेडी किल्ला हा १६ व्या शतकातील जलदुर्ग आहे. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. हा किल्ला सिंधुदुर्ग मधील Hidden लोकेशन आहे.

Redi Fort | google

घनदाट जंगल

रेडी किल्ला घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. तुम्ही येथे फॅमिली ट्रिप देखील प्लान करू शकता. येथे जाताच एतिहासाची उजळणी होईल.

Forests | google

कसं जाल?

तुम्ही सावंतवाडी किंवा कुडाळ स्टेशनला उतरा. त्यानंतर पुढे टॅक्सी किंवा बसने तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचाल. सध्या हा किल्ल्याची अवस्था खूप वाईट आहे. सर्वत्र जंगलाने वेढला गेला आहे.

How to Get There? | google

सागरी चौकी

रेडी किल्ला मराठ्यांची एक मोक्याची सागरी चौकी होता. विजापूरची आदिलशाही, मराठे, पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांच्यामध्ये वारंवार हस्तांतरित होत राहिला.

sea | google

निसर्ग सौंदर्य

किल्ल्यावरील निरीक्षण कक्ष आणि तटबंदीवरून अरबी समुद्र, रेडीची खाडी आणि आजूबाजूच्या नारळ , ताडाच्या बागांचे विहंगम दृश्य दिसते.

Natural Beauty | google

छत्रपती शिवाजी महाराज

रेडी किल्ला आग्नेय दिशा सोडून इतर सर्व बाजूंनी खंदक असलेला आणि २५ फूट उंच तटबंदी असलेला भक्कम बालेकिल्ला आहे. हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला.

Chhatrapati Shivaji Maharaj | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : 'घाटकोपर'मधील विरंगुळ्याचे ठिकाण, मुंबईच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात घालवा निवांत वेळ

Ghatkopar Tourism | saam tv
येथे क्लिक करा...