Bharat Jadhav
साप आणि मुंगूस यांच्यातील अटीतटीच्या लढाईबद्दल नेहमीच बोललं जातं.
साप आणि मुंगसाची लढाई झाली तर मुंगूस जिंकतं का?
मुंगसात आणि सापामध्ये वैर असण्याचं कारण साप मुंगसाची छोटी पिल्लं खातो, त्यामुळे त्यांच्या वैर असतं. त्यामुळेच मादी मुंगूस साप दिसतास त्यावर आक्रमण करते.
मुंगूस हे दिवसा सक्रिय असतात. विषारी सापांशी लढाई करण्यासाठी. सापाला मारण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांची चपळता त्यांची सर्वांत मोठी ताकद असते.
मुंगसाच्या काही प्रजाती अशा असतात, ज्या अत्यंत विषारी आणि धोकादायक सापांपासून देखील स्वतःचे संरक्षण करतात.
मुंगसाच्या शरीरात ॲसेटिलकोलीन रिसेप्टरमध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांच्या स्नायूंपर्यंत संदेश पोहोचतात. त्यामुळे एखाद्या सापानं दंश केला तरी तो मुंगूस वाचतो.
मोठा आणि अत्यंत विषारी साप असेल तर त्यात मुंगसाचा मृत्यू देखील होतो. अत्यंत विषारी सापाने मुंगसाच्या शरीरात प्रचंड प्रमाणात विष सोडलं त्याचा मृत्यू होतो.