Palghar Fort : शौर्य अन् इतिहासाचा अनमोल वारसा, पालघरमध्ये वसलाय 'हा' भव्य किल्ला

Shreya Maskar

पालघर

पालघर जिल्ह्यात विक्रमगड किल्ला हा ऐतिहासिक किल्ला वसलेला आहे. ही मराठा इतिहासात खोलवर रुजलेली एक साधी ऐतिहासिक वास्तू आहे.

Palghar | google

विक्रमगड किल्ला

विक्रमगड मूळतः कुडन म्हणून ओळखला जातो. हा किल्ला जव्हार संस्थानासाठी एक मोक्याचा लष्करी तळ म्हणून वापरला जात होता.

Vikramgad Fort | google

हिरवागार निसर्ग

विक्रमगड किल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगांच्या विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याच्या सभोवताली हिरवेगार जंगल आणि धबधबे पाहायला मिळतात.

Vikramgad Fort | google

किल्ल्याचे बांधकाम

विक्रमगड किल्ल्यावर मराठाकालीन दगडी बांधकाम आणि संरक्षणात्मक बुरुज आहेत. विक्रमगड किल्ला वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.

fort | google

ट्रेकिंग

विक्रमगड परिसरातील मुख्य ट्रेक म्हणजे आशेरीगड किल्ल्याचा ट्रेक. हा सुमारे २,००० फूट उंचीवर असलेला ८०० वर्षे जुना ऐतिहासिक किल्ला आहे.

Trekking | google

किल्ला कोणी बांधला?

विक्रमगड किल्ला जव्हार संस्थानाचा कोळी राजा विक्रमशाह मुकणे याने बांधला होता. जव्हारचे राजे यशवंतराव महाराज यांच्या सन्मानार्थ १० डिसेंबर १९४७ रोजी या किल्ल्याचे नाव बदलून विक्रमगड ठेवण्यात आले.

fort | google

कसं जाल?

विक्रमगड किल्ल्याला जाण्यासाठी पालघर स्टेशनला उतरून पुढे रिक्षाने तुम्ही विक्रमगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचाल.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळ्यात सुंदर दिसणारे पण धोकादायक आहेत 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स, जाण्याआधी १०० वेळा विचार करा

Maharashtra Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...