Shruti Kadam
विकी कौशलचा जन्म १६ मे १९८८ रोजी मुंबईत झाला. तो एका पंजाबी कुटुंबातील आहे. त्याचे वडील शाम कौशल हे एक प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक आणि अॅक्शन कोरिओग्राफर आहेत.
विकीने आपले शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केले आणि नंतर राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली.
चित्रपट आणि अभिनयाकडे असलेला त्याच्या आवडीमुळे त्याने "किशोर नमित कपूर अॅक्टिंग स्कूल" मधून अभिनयाचे धडे घेत थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
विकीने सुरुवातीला अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर (२०१२) या चित्रपटासह अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.
त्याला २०१५ च्या 'मसान' चित्रपटातून अभिनेता म्हणून पहिल्यांदा ओळख मिळाली. या चित्रपटातील त्याच्या "दीपक चौधरी" या व्यक्तिरेखेने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकले.
विकीला त्याच्या उरी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर, मसान, संजू आणि राझी सारख्या चित्रपटांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेअर पुरस्काराने नामांकीत आणि सन्मानित करण्यात आले आहे. तसेच यावर्षी प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
विकीने ७-९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थान येथे एका रॉयल फंक्शनमध्ये अभिनेत्री कतरीना कैफसबत लग्न केले.
विकी कौशल लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात दिसणार आहे. त्याचे चित्रीकरण सध्या सुरू आहे.