Shreya Maskar
'छावा' फेम अभिनेता विकी कौशलचा काल (16 मे) ला वाढदिवस होता. विकी आता 38 वर्षांचा झाला आहे. विकीच्या बर्थडे निमित्त कतरिना केफने एका खास अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिनाने लेक विहानसोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे आणि भावुक, हृदयस्पर्शी मेसेज लिहिला आहे.
कतरिनाने चार फोटो शेअर केले आहेत. पहिल्या आणि चौथ्या फोटोमध्ये दोघे एकत्र हसताना आणि सुंदर वेळ घालवताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये विकीच्या बर्थडेचा केक पाहायला मिळत आहे. त्यावर "happy birthday papa" असे लिहिलं आहे.
कतरिनाने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये कतरिना आणि विकीच्या लेकाची सुंदर पाठमोरी झलक पाहायला मिळत आहे. हा सहकुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते आणि कलाकारांनी शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे. विकी आणि कतरिना हे बॉलिवूडचे पावर कपल आहे.
विकी कौशल आणि कतरिना केफ यांनी डिसेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. नोव्हेंबर 2025 मध्ये विकी आणि कतरिनाने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. त्यांना पहिला मुलगा झाला, ज्याचे नाव विहान कौशल आहे.
विकी कौशलने 2015 साली रिलीज झालेल्या 'मसान' (Masaan) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 2025 मध्ये रिलीज झालेला 'छावा' चित्रपट विकीच्या करिअरमध्ये खूप खास ठरला. या चित्रपटात त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली.
विकी कौशलच्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत 'लव्ह अँड वॉर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर पौराणिक महाकाव्य असलेला 'महावतार' चित्रपटातही विकी झळकणार आहे.