Shruti Kadam
अभिनेत्री क्रिती सॅनन अंधेरी वेस्ट येथील 5,184 चौरस फूट क्षेत्रफळाच्या डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहते. या घराचे मासिक भाडे 10 लाख आहे.
या नवदांपत्याने जुहूमधील सी-व्यू फ्लॅट भाड्याने घेतला आहे. ते दरमहा 15 लाख भाडे देत असून त्याचा करार तीन वर्षांसाठी आहे.
हे दोघं जुहू येथील एका आलिशान सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांनी हे घर 3 वर्षांसाठी लीजवर घेतले असून ते दरमहा 17.01 लाख भाडे देतात.
'मन्नत'च्या नूतनीकरणादरम्यान शाहरुखने ‘पूजा कासा’ इमारतीमध्ये चार मजले भाड्याने घेतले होते. यासाठी त्याने दरमहा 24 लाख भाडे दिले.
इम्रानने करण जोहरच्या बांद्रा येथील 2,500 स्क्वेअर फूटच्या अपार्टमेंटमध्ये तीन वर्षांची लीज घेतली आहे. भाडे अंदाजे 9 लाख प्रति महिना आहे.
सारा अली खानने वर्सोवा येथील घर सोडून सांताक्रूझ येथील नवीन भाड्याच्या घरात स्थलांतर केले. तिच्या नव्या घरी 3.28 लाख भाडे आहे.
अनुपम खेर यांच्याकडे शिमला आणि चंदीगडमध्ये घरे असूनही ते मुंबईत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतात. त्यांनी याची माहिती स्वतः सोशल मीडियावर दिली होती.