Sakshi Sunil Jadhav
२ जून २०२५ रोजी अभिनेता विभू राघव याचे कोलन कॅन्सरमुळे निधन झाले.
कोलन कॅन्सर हा आजार तरुणांमध्ये वेगाने पसरत आहे.
कोलन किंवा कोलोरेक्टल कर्करोग हा आजार मोठ्या आतड्यांमध्ये होतो.
कोलन ही एक लांब नळी असते जी तुम्ही जेवलेले अन्न तुमच्या शरीराबाहेर नेण्यास मदत करते.
कोलन कर्करोगाची सुरुवात पॉलीप्स नावाच्या लहान गाठींपासून होते त्याचे रुपांतर १० वर्षांनी कोलन कॅन्सरमध्ये होते.
उलट्या, पोटदुखी, वजन कमी होणे, मलमध्ये रक्त येणे, आतड्यांचा त्रास, थकवा आणि दम भरणे ही या रोगाची लक्षणे आहेत.
आजकालच्या तरुणांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्याने त्यांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
शक्यतो तरुणांनी आहारात मांस आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे.