Dhanshri Shintre
व्होडाफोन-आयडिया सिम वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 5G सेवेसह मिळणारा सर्वात परवडणारा रिचार्ज प्लॅन कोणता आहे जाणून घ्या.
Vi कडील 5G सेवा देणारा सर्वात परवडणारा रिचार्ज प्लॅन ३९९ रुपयांत उपलब्ध असून यूजर्सना जलद इंटरनेट स्पीड मिळतो.
या ३९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना रोज २ जीबी मोबाईल डेटा मिळण्याची सुविधा दिली जाते.
₹३९९ प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते, ज्यामुळे तो स्वस्त ठरतो.
व्होडाफोन आयडियाचा ₹३९९ रिचार्ज प्लॅन २८ दिवसांची वैधता देतो आणि यूजर्सना सातत्याने डेटा व कॉलिंगची सुविधा उपलब्ध करतो.
एअरटेलचा सर्वात स्वस्त ५जी रिचार्ज ₹३७९ मध्ये उपलब्ध असून यात यूजर्सना २८ दिवसांची वैधता मिळते.
जिओ सध्या ग्राहकांना फक्त ₹१९९ मध्ये सर्वात स्वस्त ५जी प्लॅन ऑफर करते, ज्यामुळे वेगवान इंटरनेट अत्यंत कमी किंमतीत मिळते.