Fort In Sambhajinagar : इतिहास प्रेमींसाठी पर्वणी! अजिंठा-सातमाळा रांगांतील ऐतिहासिक किल्ला, संभाजीनगरला गेल्यावर नक्की पाहा

Shreya Maskar

छत्रपती संभाजीनगर

वेताळवाडी किल्ला (वेताळगड) हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वसलेला आहे. अजिंठा-सातमाळा डोंगररांगेत वसलेला हा एक ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे.

Chhatrapati Sambhajinagar | google

वेताळवाडी किल्ला

वेताळवाडी किल्ल्यावरून अजिंठा पर्वतरांगेचे नयनरम्य दृश्य दिसते. वेताळवाडी किल्ला समुद्रसपाटीपासून १९०० फूट (सुमारे ६२५ मीटर) उंचीवर वसलेला आहे.

Vetalwadi Fort | google

वेताळवाडी किल्ल्याजवळील पर्यटन स्थळे

वेताळवाडी किल्ल्याजवळ अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत. ज्यात वेताळवाडी धरण, रुद्रेश्वर लेणी आणि धबधबा, जंजाळा किल्ला, अंतूर किल्ला आणि अजिंठा लेणी यांचा समावेश आहे.

Tourist Attractions Near Vetalwadi Fort | google

ट्रेकिंग

वेताळवाडी गावातून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी साधारणपणे ४५ मिनिटांचा ट्रेक करावा लागतो. ट्रेकिंगसाठी हे एक सुंदर लोकेशन आहे.

Trekking | pinterest

प्रमुख आकर्षण

२४ विशाल बुरुज, 'जलमहाल' (पाण्याखालील राजवाडा), 'हमाम' (स्नानगृह) , 'बारादरी', 'नमाजगीर' हे प्रमुख आकर्षणे आहेत.

Key Attractions | google

कसं जाल?

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही पुढे रिक्षाने किंवा बसने वेताळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊ शकता. किल्ल्यापासून काही अंतरावर खाण्याची-राहण्याची उत्तम सोय आहे.

How to Get There? | google

कधी भेट द्यावी?

वेताळवाडी किल्ल्याला तुम्ही कधीही भेट देऊ शकता. पण हिवाळ्यात येथील वातावरण मंत्रमुग्ध करणारे असते. तुम्ही आता उन्हाळ्यात एक फॅमिली वीकेंड ट्रिप संभाजीनगरला प्लान करा आणि या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्या.

Family Picnic | Canva

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

fort | google

NEXT : 'पनवेल'जवळ आहेत ५ हिल स्टेशन्स; कडक उन्हात मिळेल काश्मीरचा फिल, फॅमिलीसोबत एकदा जाच

Panvel Picnic Spot | saam tv
येथे क्लिक करा...