Shreya Maskar
पावसाळ्यात चमचमीत खावसं वाटत असेल तर गरमागरम शेवयाचा पुलाव बनवा.
शेवया पुलाव बनवण्यासाठी शेवया, कांदा, टोमॅटो, मिरची, गाजर, तेल, मोहरी, हळद, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
शेवयाचा पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल टाकून शेवया गोल्डन फ्राय करून घ्या.
यात मोहरी, कांदा, टोमॅटो आणि मिरची घालून चांगले परतून घ्या.
त्यानंतर पुलावमध्ये गाजर, हळद, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करा.
मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून १० मिनिटे शिजवून घ्या.
शेवटी वरून कोथिंबीर भुरभुरवा आणि शेवया पुलावचा आस्वाद घ्या.
शेवयाचा पुलाव बनवताना तुम्ही बटाटा आणि आवडीच्या भाज्या देखील टाकू शकता.