Manasvi Choudhary
कोणत्याही साडीवर वेलवेटचा ब्लाऊज खुपच सुंदर दिसतो महिला व मुलींदेखील वेलवेटच्या ब्लाऊजला अधिक पसंती देतात.
वेलवेटच्या ब्लाऊजचे अनेक पॅटर्न्स आहेत जे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुमचा लूक भारी दिसेल.
स्वीटहार्ट नेक ब्लाऊज डिझाईन ट्रेडिंगमध्ये आहे. तुम्हीदेखील वेलवेट ब्लाऊजसाठी हा पॅटर्न निवडू शकता. वेलवेट कापडावरती हा ब्लाऊज पॅटर्न उठून दिसतो.
तुम्हाला डिझायनर साडीवर बोल्ड आणि मॉडर्न लूक करायचा असल्यास तुम्ही व्हिनेक वेलवेट ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता.
हाय नेक वेलवेट ब्लाऊज हा रॉयल लूक देतो गळ्याशी बारीक नक्षीकाम करून तुम्ही हा ब्लाऊज डिझाईन करून घेऊ शकता.
साध्या पण एलिगंट लूकसाठी बोट नेक बेस्ट पॅटर्न आहे. यावर तुम्ही ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला गोलाकार डिझाईन करू शकता.
वेलवेटमध्ये पूर्ण बाह्यांचे ब्लाउज खूप स्टायलिश दिसतात. बाह्यांच्या टोकावर जरदोजी किंवा मणीकाम करून त्याला रिच लूक देता येतो.