Shreya Maskar
पावसाळ्यात कोकणाचे सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.
तुम्ही कुटुंबासोबत रत्नागिरीतील गुहागरमध्ये असलेल्या 'वेळणेश्वर'ला आवर्जून भेट द्या.
कोकणातील वेळणेश्वर गाव शांततेसाठी आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
वेळणेश्वर फोटोग्राफी प्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे.
वेळणेश्वर बीच पांढरी वाळूसाठी प्रसिद्ध आहे.
वेळणेश्वर बीचला अनेक खडकांची रांग दिसते. यांवर समुद्राच्या लाटा धडकून परततात.
समुद्रकिनारी उमटलेली शिंपल्यांची नक्षी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.
कोकणातील चिपळूणजवळ वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे.
येथे वीकेंड प्लान करत असाल तर, वेळणेश्वरला अनेक रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.
वेळणेश्वरचे शिवमंदिर हे कोकणातील इच्छापूर्ती देवस्थान आहे.
वेळणेश्वरला तुम्हाला उंच,मोठी नारळाची झाड पाहायला मिळतील.
वेळणेश्वरचा समुद्रकिनारा हिरव्यागार निसर्गाने वेढलेला आहे.