Shreya Maskar
मूड फ्रेश करण्यासाठी महाराष्ट्रातील सांधण व्हॅलीत सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचा अद्भूत चमत्कार अनुभवा.
सांधण व्हॅली आशिया खंडातील मनाला भुरळ पाडणारं निसर्गरम्य ठिकाण आहे.
येथे पर्यटकांची सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी गर्दी होते.
ट्रेकिंगसाठी सांधण व्हॅली बेस्ट लोकेशन आहे.
अहमदनगरच्या साम्रद गावातून ही खोल दरी वळणं घेत जाते.
पावसाळ्यात सांधण व्हॅलीचे सौंदर्य म्हणजे निसर्गाचा अद्भूत चमत्कार होय.
येथे तुम्ही मित्रमंडळींसोबत वीकेंड प्लान करू शकता.
सांधण दरीतून निमुळती होत जाणारी वाट कित्येक ठिकाणी सूर्यप्रकाशही पोहचत नाही.
पावसाळ्यात या ठिकाणी जायचे असल्यास स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी.
सांधण व्हॅली सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देते.