ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्प्रिंग रोल शीट्स, कोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा, आले-लसूण पेस्ट, चमचा व्हिनेगर, काळी मिरी पावडर, हिरवा कांदा, मैदा आणि पाणी
स्प्रिंग रोल बनवण्यासाठी, एक नॉन-स्टिक पॅन घ्या. त्यात थोडे तेल घाला आणि कांदे हलके ब्राउन करा.
कांदा चांगला भाजल्यावर, यात आले लसूण पेस्ट घाला. नंतर कोबी, गाजर आणि शिममला मिरची घालून २-३ मिनिटे परतून घ्या.
सर्व भाज्या शिजल्यानंतर यात सॉस, व्हिनेगर, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून मिक्स करा. नंतर, ही स्टफिंग थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
एका भांड्यात पीठ आणि पाणी घालून जाडसर पेस्ट बनवा. ही पेस्ट स्प्रिंग रोल शीटवर लावा. ज्यामुळे शीट व्यवस्थित चिटकतील.
तयार केलेली स्टफिंग स्प्रिंग रोल शीटच्या एका कोपऱ्यावर ठेवून कडा आतल्या बाजूने घडी करा आणि शीट घट्ट गुंडाळा. आणि हे सर्व स्प्रिंग रोल तव्यावर किंवा एअर फ्रायरमध्ये १८० डिग्रावर फ्राय करा.
हेल्दी आणि टेस्टी व्हेज स्प्रिंग रोल तयार आहे. टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत मुलांना सर्व्ह करा.