Veg Spring Roll Recipe: लहान मुलांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत आणि टेस्टी स्प्रिंग रोल, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

लागणारे साहित्य

स्प्रिंग रोल शीट्स, कोबी, गाजर, ढोबळी मिरची, कांदा, मिरपूड, सोया सॉस, मीठ, तेल आणि कॉर्नफ्लोअर लागेल. भाज्या बारीक चिरून घ्या.

Veg Spring Roll Recipe

भाज्यांचे स्टफिंग तयार करा

कढईत थोडं तेल गरम करून कांदा परता. त्यात कोबी, गाजर आणि ढोबळी मिरची घालून हलकं परतून घ्या.

Veg Spring Roll Recipe

चव वाढवण्यासाठी मसाले घाला

भाज्यांमध्ये मीठ, मिरपूड आणि थोडासा सोया सॉस घाला. हे मिश्रण जास्त शिजवू नका, म्हणजे भाज्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहील.

Veg Spring Roll Recipe

स्प्रिंग रोल तयार करण्याची पद्धत

स्प्रिंग रोल शीटवर तयार स्टफिंग ठेवा आणि घट्ट रोल करा. कडा बंद करण्यासाठी कॉर्नफ्लोअरचं पेस्ट वापरा.

spring roll | yandex

तळताना घ्या ही काळजी

कढईत तेल गरम करून स्प्रिंग रोल मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. त्यामुळे रोल अधिक कुरकुरीत होतात.

spring roll | yandex

हेल्दी पर्यायही करू शकता

तळण्याऐवजी स्प्रिंग रोल एअर फ्रायर किंवा ओव्हनमध्ये बेक करू शकता. त्यामुळे तेल कमी लागून हेल्दी स्नॅक तयार होतो.

spring roll | yandex

सर्व्ह करण्याची योग्य पद्धत

गरमागरम व्हेज स्प्रिंग रोल चिली सॉस किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा. संध्याकाळच्या चहासोबत हा स्नॅक उत्तम लागतो.

spring roll | yandex

Hair Care: केस पातळ झालेत कपाळ मोठं दिसतयं? मग घरी करा हा सोपा हेअरमास्क केस होतील घनदाट

Hair Care:
येथे क्लिक करा