Shruti Vilas Kadam
एक चमचा मोरींगा पावडर, दोन चमचे कांद्याचा रस आणि एक चमचा आल्याचा रस एकत्र मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावा.
कांद्यामधील सल्फर आणि मोरींगा पावडरमधील व्हिटॅमिन्स केस मजबूत करतात. त्यामुळे केस तुटणे आणि गळणे कमी होण्यास मदत मिळते.
आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करतात आणि कोंड्याची समस्या कमी करतात.
मोरींगा पावडरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स भरपूर असतात. त्यामुळे केस मऊ, चमकदार आणि निरोगी दिसतात.
आलं आणि कांद्याचे गुणधर्म टाळूतील बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे खाज आणि इन्फेक्शनपासून आराम मिळू शकतो.
आलं आणि कांद्यामधील पोषक घटक टाळूतील रक्ताभिसरण सुधारतात. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळून केसांची वाढ चांगली होते.
हा हेअर मास्क 30 मिनिटे केसांवर ठेवून नंतर सौम्य शॅम्पूने धुवा. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा वापरल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.