Shruti Vilas Kadam
बेदाणे साधारणपणे हिरव्या द्राक्षांपासून तयार केले जातात, तर मनुके काळ्या किंवा लाल द्राक्षांपासून बनतात. दोन्ही पौष्टिक असले तरी गुणधर्म वेगळे असतात.
मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर आणि आयर्न जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला पटकन एनर्जी मिळते आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.
बेदाण्यांमध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी बेदाणे उपयुक्त मानले जातात.
मनुक्यांमधील आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे रक्ताची कमतरता असणाऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरतात.
बेदाण्यांमध्ये कॅलरी तुलनेने कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी बेदाणे अधिक चांगला पर्याय ठरू शकतात.
बेदाणे आणि मनुके दोन्हीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि सूक्ष्म पोषकघटक असतात. त्यामुळे हाडे मजबूत ठेवण्यास मदत मिळते.
जर रक्तवाढ आणि एनर्जी हवी असेल तर मनुके अधिक फायदेशीर आहेत. तर पचन सुधारण्यासाठी आणि हलका स्नॅक म्हणून बेदाणे उत्तम पर्याय ठरतात.