Weight Loss: खर्च न करता घरबसल्या करा वजन कमी, वापरा हे सोपी आणि आरादायी पद्धत

Shruti Vilas Kadam

सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा

दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि मेटाबॉलिझम वेगाने काम करू लागतो. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

Warm water | yandex

घरातच चालण्याची सवय लावा

जिममध्ये न जाता घरात किंवा गच्चीवर 20 ते 30 मिनिटे चालणे हा उत्तम व्यायाम ठरू शकतो. नियमित चालल्याने कॅलरी बर्न होतात.

walking girl | yandex

साखर आणि जंक फूड टाळा

चिप्स, कोल्ड ड्रिंक, बिस्किटे आणि गोड पदार्थ कमी खाल्ल्यास शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. घरचं साधं अन्न अधिक फायदेशीर ठरतं.

Suger | GOOGLE

भरपूर पाणी प्या

दिवसभर पुरेसं पाणी प्यायल्याने भूक नियंत्रणात राहते आणि शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. पाणी पिण्याची सवय वजन कमी करण्यासाठी महत्त्वाची आहे.

Drink Water | pinterest

रात्री हलकं जेवण करा

रात्री उशिरा जड अन्न खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री हलकं आणि कमी प्रमाणात जेवण करणं फायदेशीर ठरतं.

food | yandex

मोबाईल पाहताना बसून राहू नका

जास्त वेळ बसून राहण्याऐवजी अधूनमधून उठून हालचाल करा. घरकाम, जिने चढणे किंवा छोट्या हालचालींनीही कॅलरी बर्न होतात.

Late Night Awake | Saam tv

पुरेशी झोप घ्या

दररोज 7 ते 8 तास झोप घेतल्यास शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात आणि अनावश्यक भूक कमी होते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Sleep problems | GOOGLE

Rajbhog Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरी बनवा टेस्टी राजभोज, वाचा सोपी रेसिपी

Rajbhog Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा