Veg Pulao Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल टेस्टी खमंग व्हेज पुलाव, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

१ कप बासमती तांदूळ, २ चमचे तूप किंवा तेल, १ कांदा (लांब चिरलेला), १ गाजर, ½ कप मटार, ½ कप फरसबी, १ बटाटा, १ हिरवी मिरची, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची, मीठ, २ कप पाणी, कोथिंबीर.

Veg Pulao Recipe | Social Media

तांदूळ तयार करा

बासमती तांदूळ स्वच्छ धुवून २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.

Veg Pulao Recipe | Social Media

मसाल्यांची फोडणी द्या

कुकर किंवा जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करा. त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि वेलची घालून काही सेकंद परता. त्यानंतर कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

Veg Pulao Recipe | Social Media

भाज्या शिजवा

आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घाला. नंतर गाजर, बटाटा, फरसबी आणि मटार घालून ३ ते ४ मिनिटे परता, जेणेकरून भाज्यांची चव खुलून येईल.

Veg Pulao Recipe | google

तांदूळ आणि पाणी घाला

भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने परता. त्यात मीठ आणि २ कप गरम पाणी घालून एकजीव करा.

Veg Pulao Recipe | Social Media

पुलाव शिजवा

कुकरमध्ये २ शिट्ट्या होईपर्यंत किंवा भांड्यात मंद आचेवर तांदूळ पूर्ण शिजेपर्यंत पुलाव शिजवा. शिजल्यानंतर ५ मिनिटे झाकण तसेच ठेवावे.

Veg Pulao | saam tv

सर्व्ह करण्याची पद्धत

गरमागरम व्हेज पुलाव कोथिंबिरीने सजवून रायता, पापड, लोणचे किंवा दहीसोबत सर्व्ह करा. यामुळे पुलावाची चव आणखी वाढते.

Veg Pulao Recipe | google

Janhvi Kapoor: मैत्रिणीच्या लग्नात जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज; १.५ लाखांच्या काळ्या लेहंग्यात दिसली महाराणीसारखी

Janhvi Kapoor
येथे क्लिक करा