Janhvi Kapoor: मैत्रिणीच्या लग्नात जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज; १.५ लाखांच्या काळ्या लेहंग्यात दिसली महाराणीसारखी

Shruti Vilas Kadam

काळ्या लेहंग्यात रॉयल लूक

जान्हवी कपूरने मैत्रिणीच्या लग्नासाठी काळ्या रंगाचा भरतकाम केलेला लेहेंगा परिधान केला. तिचा हा एलिगंट आणि रॉयल लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Janhvi Kapoor | Saam Tv

लेहंग्याची किंमत

जान्हवीच्या या डिझायनर ब्लॅक लेहंग्याची किंमत सुमारे १.५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा लूक अधिक चर्चेचा विषय ठरला.

Janhvi Kapoor | Saam Tv

गोल्डन एम्ब्रॉयडरीने वाढवले सौंदर्य

काळ्या लेहंग्यावर केलेले आकर्षक सोनसळी भरतकाम संपूर्ण आउटफिटला रॉयल लूक देत होते. त्यामुळे तिचा लूक अधिक उठून दिसला.

Janhvi Kapoor | Saam Tv

स्टायलिश ब्लाउज

डीप नेकलाइन आणि स्लीव्हलेस डिझाइन असलेल्या ब्लाउजमुळे तिच्या एथनिक लूकमध्ये मॉडर्न टच पाहायला मिळाला.

Janhvi Kapoor | Saam Tv

मिनिमल ज्वेलरीची निवड

जान्हवीने स्टेटमेंट इअररिंग्स आणि अंगठीच्या मदतीने लूक पूर्ण केला. जड दागिन्यांऐवजी मिनिमल ज्वेलरीमुळे लेहंग्यावर अधिक फोकस राहिला.

Janhvi Kapoor | Saam Tv

ग्लॉसी मेकअप आणि मोकळे केस

न्यूड ग्लॉसी मेकअप, हलका स्मोकी आय मेकअप आणि मोकळ्या वेव्ही हेअरस्टाइलमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसले.

Janhvi Kapoor | Saam Tv

लग्नसराईसाठी परफेक्ट फॅशन इन्स्पिरेशन

रिसेप्शन, संगीत किंवा संध्याकाळच्या लग्नसमारंभासाठी काळा लेहेंगा स्टायलिश पर्याय ठरू शकतो. जान्हवी कपूरचा हा लूक फॅशनप्रेमींसाठी उत्तम प्रेरणा देणारा आहे.

Janhvi Kapoor | Saam Tv

Bath Routine: जापानी लोक सकाळी नाही तर रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करतात, जाणून घ्या यामागच्या ५ खास गोष्टी

Bath Routine | Saam Tv
येथे क्लिक करा