Veg Frankie Recipe : पावसाळ्यात घरीच १० मिनिटांत बनवा चटकदार व्हेज फ्रँकी, स्ट्रीट स्टाईल चव विसराल

Shreya Maskar

व्हेज फ्रँकी साहित्य

व्हेज फ्रँकी बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, गाजर, कोबी, कांदा, लाल तिखट, चाट मसाला, ‌हळद, मीठ, कोथिंबीर, तेल, मैदा, तेल, शेजवान चटणी, पनीर, चीज आणि मेयोनीज इत्यादी साहित्य लागते.

Veg Frankie Ingredients | yandex

मैदा

व्हेज फ्रँकी बनवण्यासाठी सर्वप्रथम मैद्याचे पीठ, मीठ आणि तेल एकत्र करून कणिक छान मळून घ्या.

Maida | yandex

पोळी

तयार पिठाचे छोटे गोळे करून त्याची पोळी लाटून दोन्हा बाजूंनी छान भाजून घ्या.

Poli | yandex

लिंबाचा रस

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, बटाटे, हळद, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घालून परतून घ्या.

Lemon juice | yandex

कोथिंबीर

शेवटी यात कोथिंबीर घालून मिक्स करा.

Coriander | yandex

शेजवान चटणी

आता मैद्याच्या पोळी‌वर शेजवान चटणी आणि मेयोनीज लावून पसरवून घ्या.

Shejwan chutney | yandex

कोबी-गाजर

त्यावर तयार सारण छान पसरवून चिरलेली कोबी आणि गाजर पसरवा.

Cabbage-carrot | yandex

चीज

वरून सर्व मसाले टाकून चीज आणि पनीर मिक्स करून व्हेज फ्रँकीचा रोल तयार करा.

cheese | yandex

NEXT : सॉफ्ट अन् कुरकुरीत रवा मेदू वडा, सकाळच्या नाश्त्याचा चटपटीत बेत

Rava Medu Vada Recipe | yandex
येथे क्लिक करा...