Veg Biryani Recipe: पाहुण्यासाठी घरी बनवा हॉटेलसारखी सुगंधी आणि चविष्ट व्हेज बिर्याणी, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

बिर्याणीसाठी साहित्य तयार करा

व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी २ कप बासमती तांदूळ, १ कप मिश्र भाज्या, २ कांदे, १ टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, दही, तेल किंवा तूप आणि मीठ घ्या. मसाल्यांसाठी तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची, जिरे, बिर्याणी मसाला आणि पुदिन्याची पाने लागतील.

Veg Biryani Recipe | saam tv

बासमती तांदूळ भिजवून घ्या

तांदूळ स्वच्छ धुऊन २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून घ्या. एका पातेल्यात पाणी उकळवून त्यात मीठ आणि थोडे अख्खे मसाले घाला. तांदूळ साधारण ७० ते ८० टक्के शिजवून गाळून घ्या.

Veg Biryani Recipe | yandex

भाज्या आणि मसाला परतून घ्या

कढईत तेल किंवा तूप गरम करा. त्यात दालचिनी, लवंग, वेलची, जिरे आणि तमालपत्र घाला. त्यानंतर चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता. आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून शिजवा.

Biryani Recipe | Social Media

भाज्यांमध्ये मसाले मिसळा

आता गाजर, मटार, फ्लॉवर, बीन्स आणि बटाटा अशा भाज्या घाला. त्यात हळद, तिखट, बिर्याणी मसाला, मीठ आणि थोडे दही मिसळा. भाज्या मऊ होईपर्यंत शिजवा. शेवटी पुदिना आणि कोथिंबीर घाला.

Veg Biryani Recipe | yandex

भात आणि भाज्यांचे थर लावा

एका जाड बुडाच्या पातेल्यात आधी भाज्यांचा मसाला पसरवा. त्यावर अर्धवट शिजवलेला भात घाला. पुन्हा भाज्यांचा थर आणि भाताचा थर लावा. वरून तळलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर घाला.

Veg Biryani Recipe | Social Media

बिर्याणी मंद आचेवर शिजवा

पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर साधारण १५ ते २० मिनिटे बिर्याणी शिजू द्या. शक्य असल्यास पातेल्याखाली तवा ठेवा, म्हणजे बिर्याणी खालून करपणार नाही. शिजल्यानंतर ५ मिनिटे झाकण तसेच ठेवा.

Veg Biryani Recipe | GOOGLE

गरमागरम व्हेज बिर्याणी सर्व्ह करा

तयार बिर्याणी हलक्या हाताने मिसळा, जेणेकरून भाताचे दाणे तुटणार नाहीत. त्यावर कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घाला. थंडगार रायता, पापड किंवा कोशिंबिरीसोबत गरमागरम व्हेज बिर्याणी सर्व्ह करा.

Veg Biryani Recipe | Social Media

Best Makeup Powder: मेकअप करताना कोणती पावडर वापरावी? तुमच्या त्वचेसाठी कोणती पावडर आहे बेस्ट?

Best Makeup Powder
येथे क्लिक करा