Manasvi Choudhary
रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटातील अभिनेत्री जिया शंकर तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.
अभिनेत्री जिया शंकर ही प्रसिद्ध युट्यूबर अभिषेक मल्हानसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहे.
सोशल मीडियावर जिया आणि अभिषेक या दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगल्या. मात्र नुकताच या चर्चांवर अभिनेत्री जिया शंकरने मौन सोडलं आहे.
जियाने तिच्या सोशल मीडियावर एका मिस्ट्री मॅन सोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला.
जियाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये एक व्यक्ती जियाच्य कपाळावर किस करताना दिसत आहे. जियानं हार्ट इमोजीनं या व्यक्तीचा चेहरा लपवला आहे.
जिया शंकरच्या या नवीन पोस्टमुळे ती अभिषेक सोबत साखरपुडा करणार नसल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
जिया तिच्या कॅप्शनमध्ये 'खोट्या अफवांना 2025 मध्येच सोडून देऊया!' असं म्हटलं आहे.