Manasvi Choudhary
लग्नसराई आणि सण उत्सवानिमित्त तुम्ही देखील नवीन मराठमोळा लूक करत असाल तर आज आम्ही तुम्हाला ब्लाऊजच्या काही स्टायलिश डिझाईन्स सांगणार आहोत.
ब्लाऊजला थोडं हटके अन् स्टायलिश लूकसाठी तुम्ही लटकन्स लावू शकता. लटकन्सच्या अनेक डिझाईन्स आहेत.
पैठणी आणि सिल्क साडीवर मॅचिंग तुम्ही कुंदन वर्क केलेले लटकन्स लावू शकता. सोनेरी रंगाचे किंवा बारीक खड्यांचे हे लटकन्स आकर्षक दिसतात.
लटकन्समध्ये झुमका पॅटर्न प्रचंड ट्रेडिंगमध्ये आहे. बारीक मोत्यांच्या डिझाईन्समध्ये झुमका लटकन्स प्रसिद्ध आहेत.
आजकाल सध्या लग्नात नवरीच्या ब्लाऊजला लटकन्स तयार करून त्यावर नाव किंवा लग्नाची तारिख असा तयार करण्याची फॅशन आहे.
आजकाल लग्नासाठी 'वेडिंग हॅशटॅग' असलेले लटकन्सही खूप चर्चेत आहेत. नवरी-नवरदेवाचे नाव किंवा लग्नाची तारीख रेशमी धाग्याने कापड्यावर विणलेली हे लटकन्स आहेत.
काचेचे छोटे तुकडे आणि त्याला मण्यांची जोड देऊन हे लटकन्स बनवले जातात. हे डिझायनर कपड्यांवर अधिक उठून दिसतात.
रेशमी धाग्यांचे लांब गोंडे आणि त्याला बारीक मोती जोडलेले लटकन्स साध्या साड्यांच्या ब्लाऊजवरही खूप उठून दिसतात.