Manasvi Choudhary
आज वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. महिला खास नटून, सजून पतीच्या दिर्घायुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.
विवाहित महिलांच्या साजश्रृंगारात मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. तुम्हीदेखील मराठमोळा लूक केला असेल तर ट्रेडिंगमध्ये असलेले 5 मंगळसूत्र पॅटर्न नक्की ट्राय करा.
सध्या बाजारात सोन्याच्या मंगळसूत्राऐवजी नवनवीन युनिक डिझाईन्सचे मंगळसूत्र पॅटर्न्स उपलब्ध आहेत.
कमी किंमतीत तुम्ही परवडतील अश्या पॅटर्न्सचे हे मंगळसूत्र आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता.
एखाद्या काठपदर साडीवर तुम्ही अश्या पद्धतीने मंगळसूत्र सेट घालू शकता. या पूर्ण सेटमध्ये मंगळसूत्राच्या पेंडंटला मॅचिंग असणारे सुंदर कानातले एकत्र मिळतात.
कमळ डिझाईनचे हे मंगळसूत्र तुम्हाला नक्कीच आवडेल कोणत्याही साडी पॅटर्नवर हे मंगळसूत्र उठून दिसेल.
नाजूक कुंदन आणि मोती डिझाईनचे हे मंगळसूत्र रॉयल लूक देते तुम्ही देखील नक्की ट्राय करा. यावर सुंदर कानातले देखील असतात.